Shrirampur APMC:सचिवपदाच्या खुर्चीला गावगुंडीची वाळवी, श्रीरामपूर बाजार समितीतील वादाला राजकीय किनार

श्रीरामपूर येथील बाजार समितीतील सचिवपदाच्या खुर्चीला गावगुंडीच्या राजकारणाने पोखरल्याने हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेला.
Shrirampur APMC:सचिवपदाच्या खुर्चीला गावगुंडीची वाळवी, श्रीरामपूर बाजार समितीतील वादाला राजकीय किनार

Shrirampur APMC Conflict: श्रीरामपूर येथील बाजार समितीतील सचिवपदाच्या खुर्चीला गावगुंडीच्या राजकारणाने पोखरल्याने हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेला. अंतर्गत कुरघोडी करताना ही संस्था शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांसाठी असल्याचा या खेळातील गावपुढाऱ्यांना विसर पडल्याचे कालच्या वादाने समोर आले.

२००४ ते १२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत किशोर काळे श्रीरामपूर बाजार समितीत सचिवपदावर कार्यरत होते. सध्याचे संचालक मंडळ सत्तेवर येण्यापूर्वी याठिकाणी विखे गटाची सत्ता होती. नंतरच्या काळात न्यायायलयाने संचालक मंडळाला मुदतवाढीस नकार दिल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत व सेवा संस्थांच्या निवडणूका पार पडल्या. बेलापूर येथील व बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी विखे गटाचे शरद नवले व अभिषेक खंडागळे यांच्यासह गावकरी मंडळाला साथ केली.

बाजार समितीवर प्रशासक आल्यावर दत्तात्रय कचरे यांनी सचिव काळे यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले. तत्कालीन प्रशासक दीपक नागरगोजे यांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी चौकशी पूर्ण होईपर्यंत सचिवपदाचा कार्यभार बाजार समितीचे ग्रेडर पदावर असलेले वाबळे यांच्याकडे देण्यास सांगितला. विखे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय वजन वापरून काळे यांना पदावनत करून वाबळे यांना प्रभारी सचिवपदी नियुक्त केले.

त्याला काळे यांनी आव्हान दिले. दरम्यानच्या काळामध्ये बाजार समितीची निवडणूक झाली. राजकीय घडामोडीत मुरकुटे-ससाणे गटाचे सुधीर नवले सभापती व विखे गटाचे बेलापूरचे अभिषेक खंडागळे उपसभापती झाले. गावकरी मंडळाचे नेते शरद नवले, खंडागळे व सभापती सुधीर नवले गट गावपातळीवर एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत.

प्रभारी सचिव वाबळे यांनी बेलापूरच्या राजकारणात गावकरी मंडळाला साथ दिली. मात्र, सुधीर नवले सभापती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले. त्यामुळे त्यांच्यावर विखे गटाची नाराजी असल्याची कुजबूज सुरू झाली. काळे यांच्यावरील आरोपांची सुनावणी जिल्हा निबंधक, सहायक संचालक, पणन मंत्री यांच्याकडे होऊन त्यांच्या बाजूने नुकताच निकाल लागला आहे. या विरोधातही उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.(Latest Marathi News )

Shrirampur APMC:सचिवपदाच्या खुर्चीला गावगुंडीची वाळवी, श्रीरामपूर बाजार समितीतील वादाला राजकीय किनार
NCP Crisis : अजित पवार गटाची मोठी खेळी; अपात्र करण्याच्या याचिकेतून वगळली 'या' तीन बड्या नेत्यांची नावं, कारण...

या सर्वांचा परिपाक मंगळवारी (ता.२१) झालेल्या मारहाणीच्या घटनेत झाला. वाबळे यांच्यासह दहा ते बारा जणांनी आपल्यासह कैलास भणगे यांना कंबरेचा बेल्ट, हॉकी स्टिकने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गाडीच्या काचाही फोडल्या. तसेच गळ्यातील सोन्याची चेन व हातातील घड्याळ तोडून नुकसान केल्याची फिर्याद काळे यांनी पोलिसांत दिली आहे.

सचिवाच्या खुर्चीचे बाहुले

दरम्यान, समितीतील एकमेंकाचे विरोधक आपसांतील जिरवाजिरवीसाठी प्रयत्नशील आहे. याचा परिणाम सचिवाची खुर्ची बाहुले होऊ लागले आहे. ज्या गटाने काळे यांना सचिव पदावरून पदावनत केले, तेच आता काळे यांना पदावर बसवण्यासाठी व ज्यांना पदावर बसवले त्यांना पदावनत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सत्ताधारी गट वाबळे यांना पदोन्नती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात आहे. (Latest Marathi News )

Shrirampur APMC:सचिवपदाच्या खुर्चीला गावगुंडीची वाळवी, श्रीरामपूर बाजार समितीतील वादाला राजकीय किनार
Uttarakhand Tunnel Rescue: बोगद्यातील मजूरांच्या सुटकेला लागणार आणखी वेळ; ड्रिलिंगचं काम तात्पुरतं थांबलं! आता दिल्लीवरुन येणार तज्ज्ञांचं पथक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com