
Satara Hill Marathon: Davindersingh Dhuppad wins gold; Shrirampur athletes bag 9 medals.
Sakal
श्रीरामपूर: साताऱ्याच्या डोंगररांगांनी रविवारी (ता.१४) श्रीरामपूरच्या धावपटूंच्या कर्तृत्वाला दाद दिली. महाराष्ट्रातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये श्रीरामपूर रनिंग क्लबचे ‘मिल्खा सिंग’ दविंदरसिंग धुप्पड यांनी सुवर्ण कामगिरी साकारत शहराचे नाव डोंगराळ शिखरांवर कोरले.