Ahilyanagar News: मूळ चौकातच अश्वारूढ पुतळा व्हावा; श्रीरामपूरमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुचाकी महारॅली
श्रीरामपूर शहरात गेली ४० वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चौकातच उभारावा, या मागणीसाठी विविध स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. याच ठिकाणी निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झाले होते; मात्र अलीकडेच दुसऱ्या जागेवर भूमिपूजन करून मूळ जागा बदलण्यात आली.
Citizens Urge for Shivaji Maharaj Statue at Central SquareSakal
श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच उभारावा, या मागणीसाठी शहरातून आज (ता.३०) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुचाकी महारॅलीचे आयोजन करण्यात आले.