Shrirampur News: बोनेटवरील सासूसह जावयाची मोटार सुसाट; प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा, थरारक प्रकाराने उडाली खळबळ

Mother in Law on Car Bonnet During Shrirampur Family Dispute: प्रेमविवाहानंतर न्यायालयाबाहेर सासू-जावयाचा थरार; बोनेटवर लटकलेल्या महिलेच्या आक्रोशाने श्रीरामपूरात हायव्होल्टेज नाट्य, नागरिकांच्या प्रसंगावधानाने कार थांबली.
Shrirampur Viral Family Dispute Mother in Law Climbs Car Bonnet During Love Marriage Confrontation

Shrirampur Viral Family Dispute Mother in Law Climbs Car Bonnet During Love Marriage Confrontation

sakal

Updated on

श्रीरामपूर : ‘दृश्यम’ चित्रपटातील सस्पेन्स आणि ‘पुष्पा’ किंवा ‘सिंघम’सारख्या साऊथ ॲक्शनपटातील क्लायमॅक्सलाही मागे टाकेल, असा थरारक ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ श्रीरामपूर शहरात घडला. कौटुंबिक वादाच्या ठिणगीतून जावयाने बोनेटवर बसलेल्या सासूसह रस्त्यावरून सुसाट मोटार पळवली. या थराराचा अखेर सय्यदबाबा चौकात नागरिकांनी प्रसंगावधान राखून वाहने आडवी लावल्याने आणि मेहुण्याने कारच्या काचेवर दगडफेक केल्याने ‘दी एन्ड’ झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com