Crime News : धक्कादायक! चोरीच्या संशयातून दलित तरूणांना झाडाला उलटं लटकावून मारहाण; श्रीरामपूर येथील घटना

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
Crime News
Crime NewsSakal

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून एका तरूणाला झाडाला बांधून त्याच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आले आहे. शेळी चोरीच्या संशयातून ही घटना घडली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ही घटना घडली आहे.

अधिक माहितीनुसार, शेळी आणि कबुतर चोरल्याचा संशय या दलित तरूणांवर होता. त्यानंतर त्यांना घरातून उचलून नेत झाडाला उलटं लटकावून त्यांच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आल्याची माहीती पीडितांच्या कुटुंबियांनी दिली आहे. मारहाणीमध्ये शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड आणि खंडागळे हे तरूण जबर जखमी झाले आहेत. त्यांना शिरापूर येथील हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Crime News
Teacher Video : शिक्षक असावा तर असा! ZP शाळेतील शिक्षक भन्नाट पद्धतीने शिकवतायेत डान्स

दरम्यान, याप्रकरणी दलित संघटनांनी आवाज उठवायला सुरूवात केली असून आरोपींचा तपास पोलिस घेत आहेत. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तरूणांना झाडाला उलटं लटकावलेलं दिसत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com