

Teachers and education staff during the silent march outside Ahmednagar Collector Office opposing the TET policy.
Sakal
अहिल्यानगर: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी (ता.९) मूक मोर्चा काढला. या मोर्चात शिक्षक, शिक्षकेतर हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.