

A Year Without Help: Bal Sangopan Scheme Leaves Children Abandoned in Hardship
Sakal
अहिल्यानगर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा होत आहेत. मात्र, ही योजना राबविणाऱ्या महिला व बालविकास खात्याच्याच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या दीड लाख लाभार्थी मुलांना पैसे देण्यास चालढकल केली जात आहे. परिणामी गेल्या वर्षभरापासून हे लाभार्थी लाभापासून वंचित आहेत.