esakal | बेलवंडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यासह सहा पोलिस कर्मचारी कोरोना बाधित

बोलून बातमी शोधा

Six police personnel from Belwandi police station have  positive for corona}

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, दिवसापूर्वी बेलवंडी पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला.

बेलवंडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यासह सहा पोलिस कर्मचारी कोरोना बाधित
sakal_logo
By
संजय आ.काटे

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या थांबत नसून आता बेलवंडी पोलिस ठाण्यातील पाच पोलिस कर्मचारी व एक अधिकारी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्यांना कोरोनाचा सामना करावा लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, दिवसापूर्वी बेलवंडी पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. कोरोना चाचणी  केल्या त्यात पाच कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह आले. यात एक महिला कर्मचारी आहे. मात्र सगळ्यांची प्रकृती चांगली असून हे सगळे कर्मचारी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान लस घेतल्यानंतरही ते कोरोना बाधित कसे झाले यावर डॉ. खामकर म्हणाले, लस घेतल्यानंतर सुमारे १५ ते २० दिवस गेल्यावर त्या लसीचा परिणाम दिसून येतो. मात्र लस घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात हे पोलिस कर्मचारी बाधित आढळले आहेत. त्यामुळे लस घेण्याचा त्यांच्यावर परिणाम होण्याअगोदरच कोरोना पॉझिटिव्ह आले.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे म्हणाले, पोलिसांना कामाचा ताण जास्त आहे. त्याही परिस्थितीत सगळेजण मास्क लावून व सॅनिटायझर बाळगून दक्षता घेत आहेत. सगळ्या पोलिसांना लस दिली असून काही दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या असून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जे कर्मचारी कोरोना बाधित आहेत ते ठणठणीत असून काळजीचे कारण नाही.