
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (SMART) या योजनेत जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी, आत्माचे शेतकरी नोंदणी गट यांनी सहभागी व्हावे.
पारनेर (अहमदनगर) : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (SMART) या योजनेत जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी, आत्माचे शेतकरी नोंदणी गट यांनी सहभागी व्हावे.
त्यांना मुल्य साखळी विकासासाठी उत्पादन भागीदारी उपप्रकल्प, बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पसाठी सहभागी होता येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी दिली.
कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (SMART)या योजनेत शेतकरी उत्पादक कंपण्यासाठी 250 तर शेतकरी गटांसाठी 750 शेतकरी सभासद असणे गरजेचे असल्याचेही गयकवाड यांनी सांगीतले. यामध्ये पेरणी पासुन मार्केटिंग पर्यंत विविध टप्प्यावर आवश्यक असणारी यंत्र सामुग्री, प्रक्रीया उद्धोग, गोडाऊन, माल वाहतुकीसाठी आवश्यक वाहन, शितगृह तसेच त्या अनुषंगीक बाबींचा प्रकल्प करणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या खर्चाच्या सुमारे 60 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. उपलब्ध होणार आहे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उत्पादक भागीदारी उपप्रकल्प मध्ये संस्थात्मक खरेदीदार निश्चित करुन त्यांचे बरोबर सात वर्षाचा करार आवश्यक असुन, बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पामध्ये राज्याबाहेर मार्केट निश्चिती करणे आवश्यक आहे. या योजनेत कांदा, सिताफळ, वाटाणा, ज्वारी, सेंद्रीय शेती, शेतमाल, शेळया व परसबागेतील कुकुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकास योजणेसाठी अर्थ सहाय्य उपलब्ध आहे.
या योजनेतून ऊस, दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योग, बांबु व्यवसायीक कुकुट पालन यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकल्पांना अनुदान मिळणार नाही. तसेच ज्या प्रकल्पांचा स्मार्ट प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे त्या प्रकल्पा च्या जागा खरेदी मात्र अनुदान देण्यात येणार नाही याचीही शेतकरीव उत्पादक कंपण्यांनी नोंद घ्यावी असेही गायकवाड यांनी सांगीतले.
स्मार्ट प्रकल्पासाठी नोंदणी कशी कराल- www.smart-mh.org या संकेतस्थाळावर ऑनलाईल नोंदणी करावी. त्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारिख आहे.अधिक माहितीसाठी तालुका किंवा मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
संपादन : अशोक मुरुमकर