

Police Mock Drill Turns Dangerous After Smoke Grenade Blast Injures Four
sakal
अहिल्यानगर: बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मॉक ड्रिल (प्रात्यक्षिक) दरम्यान ‘स्मोक ग्रेनेड’चा स्फोट झाल्याने चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी १० च्या सुमारास हा प्रकार घडला. एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हातातच या ग्रेनेडचा स्फोट झाला. त्यात दोघे गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.