

Farmers struggling with increased cost of cultivation in Ahmednagar district
sakal
पारनेर : आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे, शेतीमालाला मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत. ५० किलोच्या गोणीमागे तब्बल २०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढ झालीय. डिझेलमुळे पेरणीचा खर्च वाढणार आहे.