.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
-विलास कुलकर्णी
राहुरी : रब्बीची पिके बाळसं धरू लागली आहेत. पिकांना खताची गरज भासत आहे. परंतु, राहुरी तालुक्यात रासायनिक खतांचा तुटवडा आहे. युरिया कुठेही शिल्लक नाही. कुणी युरिया देता का... युरिया, असे म्हणत शेतकऱ्यांना खत डेपो व कृषी सेवा केंद्रांची उंबरठे झिजवावे लागत आहे. रासायनिक खत मिळाले, तर त्यालाही लिंकिंग सुरू आहे. त्यामुळे खतासाठी वणवण फिरणारे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.