Ahmednagar News : मयत व्यक्तीची जमीन विकली; बनावट मुखत्यारपत्र तयार केले; फसवणुकीचा गुन्हा दाखल

 मयत असलेल्या जमीन मालकाचे बनावट मुखत्यारपत्र तयार करून जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला आहे.
sold land of the dead person forged power of attorney Fraud case registered ahmednagar
sold land of the dead person forged power of attorney Fraud case registered ahmednagarSakal

पाथर्डी :  मयत असलेल्या जमीन मालकाचे बनावट मुखत्यारपत्र तयार करून जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला आहे. या घटनेत फसवणूक झालेल्या दिगंबर लक्ष्मण जावळे (रा. पोखर्डी, ता. जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी  मच्छिंद्र बन्सी जऱ्हाड याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे या संदर्भात दुय्यम निबंधक अधिकारी कार्यालयाने सुद्धा या संदर्भातील कागदपत्रांची शहानिशा न केल्याने नवल व्यक्त केले जात आहे. या घटनेतील जमिनीचा मूळ मालक १९९७ साली मयत असताना २००६ साली बनावट मुखत्यारपत्र तयार करून जावळे यांची साडेतीन एकर जमीन मच्छिंद्र जऱ्हाड (रा. चिचोंडी) याने उध्दव अंजाबा गिते (रा. डोंगरवाडी, ता. पाथर्डी) यांना विक्री केली.

दिगंबर जावळे यांनी वैभव खलाटे यांच्याकडून चिचोंडी येथे २ हेक्टर ४१ आर जमीन २०१२ साली खरेदी केली होती. १० मार्च २०२३ रोजी उध्दव अंजाबा गिते यास जावळे यांची जमिनीची खरेदी मच्छिंद्र जऱ्हाड याने बनावट मुखत्यारपत्राच्या आधारे करून दिली. जमिनीच्या खरेदीमध्ये वापरलेले मुखत्यारपत्र हे खोटे व बनावट असून, जमिनीचे मूळ मालक बापू राणू जऱ्हाड हे १९९७ साली मयत झाले आहेत. ते २००६ मध्ये मुखत्यारपत्र कसे बनवतील, तसेच मुखत्यारपत्र नोंदणीची तारीख १७ डिसेंबर २००६ ही दाखवली आहे.

सदर दिवशी रविवार येत आहे. त्यावरून असे लक्षात येते की, जावळे यांच्या मालकीची चिचोंडी (ता. पाथर्डी) येथील शेत गट क्रमांक १७१ मधील २ हेक्टर ४१ आर जमीन मच्छिंद्र जऱ्हाड याने खोटे व बनावट शिक्क्यांचा वापर करून खोटे मुखत्यारपत्र तयार करून ती जमीन विकली.

शहानिशा न करता दस्त नोंदविला

पाथर्डीच्या दुय्यम निबंधक कार्यालयाने कोणतीही चौकशी व कागदपत्रांची शहानिशा न करता सदर दस्त नोंदविला. जावळे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश मुलगीर तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com