esakal | नगरचा जवान गुवाहाटीतून बेपत्ता; घातपात असल्याचा पत्नीचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

rajendra deshmukh

नगरचा जवान गुवाहाटीतून बेपत्ता; घातपाताचा पत्नीचा संशय

sakal_logo
By
​शांताराम काळे

अकोले (जि.अहमदनगर) : तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी व अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्यात नोकरीस असलेला जवान बेपत्ता झाला आहे. राजेंद्र बाळासाहेब देशमुख (वय ३९ वर्षे रा. कोतुळ, ता. अकोले) असे या जवानाचे नाव आहे. भारतीय सैन्य दलात भटिंडा, १११ रॉकेट रजिमेंट येथे हवालदार म्हणून सैन्यात सेवेत आहे. त्यांची बदली ईटानगर अरूणाचल प्रदेश एनसीसी बटालीयन ईटानगर येथे झाली. दरम्यान, १५ दिवसांच्या रजेवर ते घरी आले होते. त्यानंतर (ता. २६ जून २०२१) रोजी ते कर्तव्यावर रूजू होण्यासाठी कोतुळ वरून नाशिक येथून रेल्वेने अरुणाचल प्रदेश ईटानगर या ठिकाणी कामावर रूजु होण्यासाठी गेले होते. ते ( ता. २९ जून २०२१) रोजी ईटानगर येथे कामावर हजर झाले. त्यानंतर (ता. २९ व ३० जून २०२१) रोजी तेथेच कॉरंटाईन राहिले. (soldier-from-Kotul-missing-from-Guwahati-marathi-news-jpd93)

.....तेंव्हापासून संपर्क तुटला

एक जुलै २०२१ रोजी रात्री १२.३० वाजता रेल्वेचे रिझर्व्हेशन करून ईटानगर ते गुवाहटी पर्यंत त्यांनी प्रवास केला. त्यानंतर त्याच दिवशी एक जूलै २०२१ रोजी गुवाहाटी येथे आले. तेंव्हापासून त्यांचा संपर्क तुटला आहे. तो आजपर्यंत त्यांचा संपर्क झाला नाही. हा सर्व प्रकार घातपात असल्याचा संशय पत्नी सुनीता राजेंद्र देशमुख यांनी व्यक्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: श्रीगोंद्यात राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी! विखे गटाची साथ

हेही वाचा: भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन उभे करणार: अण्णा हजारे

loading image