esakal | भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन उभे करणार: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
sakal

बोलून बातमी शोधा

Anna Hazare

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन हे चारित्र्यावर आधारित असावे. मध्यंतरी काही ठिकाणी या आंदोलनात राजकारण व काही उणिवा असल्याचे लक्षात आल्याने चळवळ थांबविली.

भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन उभे करणार: अण्णा हजारे

sakal_logo
By
मार्चंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : ‘‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन चळवळीमुळे राज्यातील भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला आहे, याचे समाधान आहे. या आंदोलनामुळे राज्यात १० कायदे झाले. आता नव्या दमाने पुन्हा एकदा ही चळवळ राज्यात उभी करणार आहोत,’’ असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (senior social activist anna hazare) यांनी सांगितले.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 559 नवे कोरोना रुग्ण; पाच रुग्णांचा मृत्यू

‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन हे चारित्र्यावर आधारित असावे. मध्यंतरी काही ठिकाणी या आंदोलनात राजकारण व काही उणिवा असल्याचे लक्षात आल्याने चळवळ थांबविली. नुकतीच राज्यातील ३५ जिल्हाध्यक्षांची ऑनलाइन बैठक झाली. तिथे सर्वच जिल्हाध्यक्षांनी, ही चळवळ पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याची मागणी केली. कोरोना संपल्यानंतर सर्व जिल्हाध्यक्ष प्रत्येक जिल्ह्यात दौरे करून बैठका घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मोठे संघटन उभे करण्यात येईल.’’

हेही वाचा: बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांवर

ते म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाने राज्यात माहिती अधिकारासह दफ्तरदिरंगाई, बदल्यांचा कायदा, ग्रामसभेला जादा अधिकार, लोकायुक्त, लोकपाल, ग्रामरक्षक दल, दारूबंदी नागरिकांची सनद यांसारखे १० कायदे जनतेला दिले आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनास मोठे यश मिळाले आहे. याचा विचार करता, जनहितासाठी ही चळवळ पुन्हा एकदा जनतेच्या आग्रहाखातर सुरू करीत आहोत. एकाच वेळी ३५ जिल्ह्यांत आंदोलन उभे राहिले, तर त्याचा मोठा प्रभाव पडेल व कोणतीही मागणी मंजूर करण्याशिवाय सरकारपुढे पर्याय राहणार नाही. मात्र, हे आंदोलन चारित्र्यावर आधारित असावे, अशी माझी संकल्पना होती व यापुढेही राहणार आहे.’’

हेही वाचा: अहमदनगर: विधवा भावजयी बरोबर लहान दीराचा विवाह मोठ्या थाटात संपन्न

‘‘यापूर्वीच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन चळवळीत काही उणिवा दिसल्याने, काही काळ मी चळवळ थांबविली होती. आता नव्याने सुरू करीत आहोत. या चळवळीत नव्या दमाचे तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या आंदोलनातून जनहिताचे काही कायदे करण्यास मदत होईल, तसेच भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी मोठी मदत होणार आहे,’’ असेही हजारे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीच्या सोशल मीडियावर अश्‍लील व्हिडिओ; अहमदनगर जिल्ह्यातील युवकास अटक

जनता जागरूक नाही

नशा येणाऱ्या पदार्थांवर बंदी घालणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. चंद्रपूर येथील दारूबंदी उठवली. त्यावर राज्यभरात आंदोलने होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही, याचे मोठे दुःख वाटले. जनतेने सरकारच्या या निर्णयास विरोध केला नाही, याचा अर्थ जनता जागरूक नाही, असा होतो, अशी खंत हजारे यांनी व्यक्त केली.

loading image