

Warm welcome and celebrations in Kanhur Pathar village after Rajesh Sonawale’s election as Mumbai corporator.
Sakal
टाकळी ढोकेश्वर: कान्हूर पठार (ता. पारनेर) सुपुत्र राजेश सोनावळे यांची मुंबई महानगरपालिकेच्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून नगरसेवकपदी निवड झाली. वॉर्ड क्रमांक ११९ मधून शिवसेनेतर्फे (शिंदे गट) निवडणूक लढवत त्यांनी तब्बल बाराशे मतांच्या आघाडीने विजय संपादन केला. या यशामुळे कान्हूर पठारसह परिसरात आनंदाचे वातावरण आहे. गेल्या तीस वर्षांपासून राजेश सोनावळे मुंबईत वास्तव्यास असून, त्यांनी तळागाळातून राजकीय वाटचाल केली.