

Against All Struggles, Ganesh Achieves His Dream of Becoming Agniveer
Sakal
राहाता : आई-वडील कष्टकरी. या कष्टकरी दाम्पत्याचे पांग मुलाने फेडले. गणेश गाडेकर याची लष्करात निवड झाली. टेक्निकल विभागातील कौशल्य आत्मसात केल्याने त्याला ही संधी मिळाली. त्यासाठी आवश्यक असलेली सीईई परीक्षा तो उत्तीर्ण झाला. परीक्षेचा निकाल आणि नोकरीची आर्डर एकाचवेळी त्याच्या हातात मिळाली. धन्वंतरी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर व बाजार समितीचे संचालक दिलीप गाडेकर यांच्या हस्ते आज त्याचा सत्कार करण्यात आला.