esakal | सोनई कॉलेजला मिळाला फोर स्टार दर्जा, "मुळा"चा लौकिक दिल्लीत
sakal

बोलून बातमी शोधा

Sonai College gets Four Star status, "Mula" in Delhi

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इंनोव्हेशन सेल अंतर्गत उच्च शिक्षणामध्ये नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी व संशोधनासाठी देश पातळीवर  'इन्स्टिट्युशन्स इंनोविशन कौन्सिल' ही परिसंस्था तयार करण्यात आली आहे.

सोनई कॉलेजला मिळाला फोर स्टार दर्जा, "मुळा"चा लौकिक दिल्लीत

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे  : भारत सरकार शिक्षण मंत्रालयाच्या  'इन्स्टिट्युशन्स इंनोविशन कौन्सिल' या संस्थेंतर्गत महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना व संशोधन असे उपक्रम राबविलेबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास राष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे समजले जाणारे 'फोर स्टार' मानांकन प्राप्त झाले आहे. 

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इंनोव्हेशन सेल अंतर्गत उच्च शिक्षणामध्ये नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी व संशोधनासाठी देश पातळीवर  'इन्स्टिट्युशन्स इंनोविशन कौन्सिल' ही परिसंस्था तयार करण्यात आली आहे. या अंतर्गत सोनई महाविद्यालयाने स्वत:ची इंनोव्हेशन परिषद स्थापन केलेली आहे.

ही परिषद ग्रामीण भागातील महाविद्यालयीन युवकांमध्ये अभिनव संस्कृती वाढविण्यासाठी, नवीन कल्पनांसह कार्य करण्यास प्रोत्साहित करते व नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी या कौन्सिल मार्फत प्रयत्न केले जातात.

या परिषदेने केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल प्रत्येक वर्षी भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय घेत असते. यामध्ये महाविद्यालयांनी वेगवेगळ्या स्तरावर केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना व संशोधन यांचा आढावा घेऊन भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून स्टार मानांकन दिले जाते. 

सन २०१९-२० साठी  संपूर्ण भारतातून एकूण एक हजार सहाशे  महाविद्यालये, विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्था यांनी यात सहभागी होते.  देशातील आठ विभागापैकी पश्चिम विभागातून (महाराष्ट्र व गोवा) सोनई महाविद्यालय 'फोर स्टार' मानांकन मिळून विभागीय पातळीवर 38 व्या क्रमांकावर व  पुणे विद्यापीठात व नगर जिल्ह्यात असलेल्या अव्यावसायिक महाविद्यालयामध्ये सोनई महाविद्यालय हे प्रथम क्रमांकावर आहे. 

यामुळे ‘नवउद्योजक घडवणारे महाविद्यालय’ असा नावलौकिक महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. यासाठी महाविद्यालयाने बौद्धिक संपदा कार्यशाळा, सामाजिक उद्योजकता व नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धा हे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातून विद्यापीठ स्तरावरील क्लस्टर स्पर्धेमध्ये तीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

यासाठी मुळा एज्युकेशने'संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी मार्गदर्शनाखाली सोनई महाविद्यालयास आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी सांगितले. या यशाबद्दल राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व यश ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी 'टीम सोनई महाविद्यालय'चे अभिनंदन केले आहे

‘मी उद्योजक’साठी निवड 

‘मी उद्योजक’ या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील बारा प्रकल्प विद्यार्थ्यानी सादर केले होते. यामध्ये  एम एस्सीचे चैताली क्षीरसागर,  विशाल अंबाडे, योगेश डावखर व  प्रतिक थिटे या चार विद्यार्थ्यांचे प्रकल्प विभागीय पातळीवर सादर करण्यासाठी निवड झाली आहे. 

"सोनई महाविद्यालयास 'फोर स्टार' मानांकन प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव गडाख यांचे स्वप्न खर्यास अर्थाने साकार होईल. हे प्रयत्नांचे यश आहे.  
- प्रशांत पाटील गडाख, अध्यक्ष, मुळा एजुकेशन सोसायटी, सोनई