
सोनई : नेवाशातील भाजप नगरसेवकांच्या हाती शिवबंधन
सोनई : नेवासे नगरपंचायतीतील भाजपच्या नगरसेवकांसह युवकांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची साथ सोडून जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. मुरकुटे गटाला हा जोरदार धक्का मानला जात आहे.
मागील तीन महिन्यांपासून मुरकुटे गटाचे अनेक प्रमुख कार्यकर्ते मंत्री गडाखांच्या गटात दाखल होत आहेत. मुरकुटे यांचे गाव असलेल्या देवगावात शिवसेनाप्रवेशाचा भूकंप झाल्याने, ही गळती कशी रोखावी, हा प्रश्न भाजप गटाला सतावत आहे. घोडेगाव, कुकाणे, खरवंडी, सोनई येथेही पक्षप्रवेशाचे भूकंप होत आहेत.
नेवाशाच्या प्रभाग चौदामधील विद्यमान नगरसेवक राजेंद्र मापारी, युवा नेते स्वप्नील मापारी यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मापारी, भारतीय जनता युवा मोर्चाचे शरद पंडुरे, सोमेश मापारी, सागर पंडुरे, अनिकेत मापारी, गणेश चौधरी, तुषार परदेशी, अजय रासने, प्रवीण गायकवाड, समीर मापारी, प्रसाद मापारी, आशिष मापारी, गौरव राहुरकर, तेजस मापारी, शिवाजी शेजूळ, राहुल म्हस्के, अक्षय करंडे यांनी सोनई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला.
वाढदिवसाची भेट...
नेवासे नगरपंचायतीची लवकरच निवडणूक होणार असल्याने नगरसेवक मापारी यांचा शिवसेनाप्रवेश शहरात ताकद वाढविणारा ठरला आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्यासाठी हा प्रवेश वाढदिवसाची भेट ठरला आहे.
Web Title: Sonai Shivbandhan Hands Bjp Corporators Nevasa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..