esakal | पर्यटकांना खुणावतोय सोनकडा धबधबा
sakal

बोलून बातमी शोधा

sonakada falls is a tourist attraction at nagalwadi

पर्यटकांना खुणावतोय सोनकडा धबधबा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बोधेगाव (जि. नगर) : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला परिसरातील डोंगरदऱ्यांतून खळखळून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याने निसर्गसौंदर्यात भर घातल्याचे दिसते. नागलवाडी (ता. शेवगाव) येथील सोनदरी डोंगरावरून कोसळणारा सोनकडा धबधबा सध्या पर्यटकांना खुणावतो आहे.

बोधेगाव (ता. शेवगाव) येथून पंधरा किलोमीटरवर नागलवाडी, गोळेगाव परिसरात वाल्मीकी ऋषी व राम-सीतेचा अधिवास लाभलेले श्रीक्षेत्र काशीकेदारेश्वर देवस्थान आहे. या ठिकाणाकडे जाताना रस्त्यालगतच हिरवाईने नटलेला सोनदरी डोंगर नजरेस पडतो. डोंगरावरून धबधब्याकडे खाली उतरण्यासाठी पायऱ्या असलेला पूल आहे. खाली जाताच प्रथम महानुभाव पंथाचे प्रार्थनास्थळ दिसते. महानुभाव पंथाचे अनुयायी येथे विविध सणांनिमित्त दीपोत्सव साजरा करतात. तेथून पश्चिमेस खाली डोंगराच्या उंच कड्यावरून कोसळणारा नयनरम्य सोनकडा धबधबा पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडतो, तर पशुपक्ष्यांची किलबिल व खळखळून वाहणारे झरे मन मोहवून टाकतात. येथील डोंगररांगेत हिरडा, बेहडा, गुळवेल, गुंज आदी गुणकारी वनऔषधीदेखील आहेत. याचबरोबर मोर, ससे, हरणे, काळविटे अशा वन्य जीवांसह येथील समृद्ध निसर्गसंपदा पाहायला मिळते. दुर्लक्षित असलेला येथील समृद्ध निसर्ग मागील काही वर्षांपासून प्रकाशझोतात आला असला, तरी हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणे गरजेचे असल्याची भावना पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: तनपुरे कारखाना कामगारांनी फासले प्रवरेच्या कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळे

मिनी भंडारदरा प्रलंबित

चारही बाजूंनी डोंगररांगांचे नैसर्गिक वरदान लाभलेला गोळेगावचा पाझर तलावही याच परिसरात पाहायला मिळतो. हा तलाव परिसरात मिनी भंडारदरा म्हणून ओळख प्राप्त करीत आहे. मात्र, त्याच्या मातीच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून वाया जात असल्याने, तलावास सिमेंट काँक्रिटची भिंत बांधण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांसह जनशक्ती मंडळाचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे काही वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत. मात्र अद्याप ही मागणी प्रलंबितच असल्याचे दिसते.

हेही वाचा: पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळवून देऊ : खासदार विखे पाटील

loading image
go to top