esakal | संगमनेरात विशेष पथकांचे जुगार अड्ड्यांवर छापे
sakal

बोलून बातमी शोधा

Special teams raid gambling dens in Sangamnera

पोलिस महासंचालक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने काल (गुरुवार) दुपारी वडगाव पान येथील हॉटेलमागील घरात छापा घातला.

संगमनेरात विशेष पथकांचे जुगार अड्ड्यांवर छापे

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महासंचालकांच्या विशेष पथकाने काल (गुरुवारी) वडगाव पान येथील एका व संगमनेर शहरातील दोन मटकाअड्ड्यांवर छापे घातले. तिन्ही ठिकाणांहून 3 लाख 86 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन मटका बुकींसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

पोलिस महासंचालक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांच्या पथकाने काल (गुरुवार) दुपारी वडगाव पान येथील हॉटेलमागील घरात छापा घातला.

जुगार खेळणाऱ्या 15 जणांकडून जुगाराची साधने, दुचाकी व रोख रकमेसह 2 लाख 29 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत दीपक ठाकूर (पोलिस मुख्यालय, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अशरफ समशेरअली जहागीरदार व ताराचंद गर्गे (दोघेही रा. संगमनेर), निहाल शेख, जगन भिडे, बाबासाहेब गवळी, विकास जाधव, महेंद्र गायकवाड, संजय गायकवाड यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

शहरातील आरगडे गल्लीतील मटकाअड्ड्यावर छापा घालून 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत विश्वेश हजारे (दोंडाईचा पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, कपिल चिलका, जयवंत अभंग व शंकर इटप यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

तीन बत्ती चौकात मटकाअड्ड्यावर छापा घालून रोख 14 हजार 300 रुपयांसह 52 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कॉन्स्टेबल दीपक ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार अशरफ जहागीरदार व मच्छिंद्र काकडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.