esakal | विखे पाटील यांना शिवेसेनेत घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी कोंडलेला हिरा कोंदनात बसवला
sakal

बोलून बातमी शोधा

Speech of Chief Minister Uddhav Thackeray at Vikhe Patil program

विखे पाटील हे घराने मुळचे काँग्रेसचे पण तरीही पक्षाच्या पलिकडे जाऊन त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विखे पाटील यांना शिवेसेनेत घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी कोंडलेला हिरा कोंदनात बसवला

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : विखे पाटील हे घराने मुळचे काँग्रेसचे पण तरीही पक्षाच्या पलिकडे जाऊन त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, डॉ. सुजय विखे पाटीलही यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विखे पाटील घराने हे काँग्रेसचे इंदीरा निष्ठ आणि आणिबाणी समर्थक होते. पण तरीही हा माणूस आपल्या पक्षात कसा घ्यायचा असा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी केला नाही. त्यांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन विचार केला. त्यांना शिवेसेनेत घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी कोंडलेला हिरा कोंदनात बसवला होता. विखे पाटील व ठाकरे कुटुंबाचे पूर्वीपासूनचे ऋणाबंद आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या प्रश्‍नाची उत्तरे सुधारीत कृषी कायद्यातही : पंतप्रधान मोदी
डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेकदा लोकसभेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे आत्मचरित्र, ‘देह वेचावा कारणी’ त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीतील त्याच्या सेवाव्रती जीवनाचा आणि कृषी तसेच सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या विविध पथदर्शी कामांचा आलेख मांडणारे हे पुस्तक आहे.

बाळासाहेब विखे पाटील यांचा १९६२ मध्ये सत्कार ठेवण्यात आला होता. तेव्हा कृपाकरुन कोणाचेही चुकीचे काम करु नका, भेदभाव विरहीत काम करण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. काम केले. ७१३ पानाचे आत्मचरित्र हे शेती, सिंचन आणि राजकारण याला दिशा देणारे आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.