esakal | श्रीश्रीश्री श्रीमद गुरूनाथेंद्र सरस्वती महास्वामीजी निवर्तले
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Srimad Gurunathendra Saraswati Mahaswamiji passed away

आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केल्या पीठापैकी महत्त्वाचे मुळपीठ यादगिरी असून स्वामी हे विश्वकर्मा समाजाचे धर्मगुरू होते. श्री. गुरुनाथेंद्र सरस्वतींचे अध्यात्मिक, सामाजिक, अध्ययन, कार्य आणि महती महान होती अशी भावना गोविंदाचार्य यांनी व्यक्त केली.

श्रीश्रीश्री श्रीमद गुरूनाथेंद्र सरस्वती महास्वामीजी निवर्तले

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले : विश्वकर्मा ब्राह्मण समाजाचे धर्मगुरू, आनेगुंदी महासंस्थान सरस्वती पीठ यादगिरी कलबुर्गी { कर्नाटक } विश्वकर्मा एकदंडी मठाधिपती यतिवर्य परम पूज्य श्री श्री श्री श्रीमद गुरूनाथेंद्र सरस्वती महास्वामीजी काल (शुक्रवारी) सायंकाळी 5 वाजता इहलोकाचा त्याग करून ब्रह्मलीन झाले. 

स्वामीजी 92 वर्षांचे होते. आचार्य गोविंद पांचाळ म्हणाले की, आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केल्या पीठापैकी महत्त्वाचे मुळपीठ यादगिरी असून स्वामी हे विश्वकर्मा समाजाचे धर्मगुरू होते. श्री. गुरुनाथेंद्र सरस्वतींचे अध्यात्मिक, सामाजिक, अध्ययन, कार्य आणि महती महान होती अशी भावना गोविंदाचार्य यांनी व्यक्त केली. 

विश्वकर्मा ज्ञानज्योती मध्य प्रदेश उज्जैन येथील आचार्य संत जगदीश महाराजां यांनी शब्द सुमनांजली समर्पित करतांना म्हणाले, श्री गुरुनाथेंद्र स्वामी चे कर्नाटक आणि महाराष्ट्रात एक समृद्ध विद्यार्थी शिष्य परिवार आश्रम आहे. विश्‍वकर्मा ब्राह्मण समुदायाने जगतगुरु स्वामीजी यापुढे आपल्यामध्ये नाहीत.

हेही वाचा - नगरच्या चिमुरडीमुळे व्हाईट हाऊस अवाक्

स्वामीजींच्या त्यागाने संपूर्ण विश्वकर्मा ब्राह्मण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. समाज मठ आणि पीठमध्ये येणार नाही तोपर्यंत धार्मिक अध्यात्मिक शक्तीचे महत्त्व कळणार नाही, अशी प्रतिक्रिया आचार्य जगदिश यांनी व्यक्त केली. पंढरपूरचे अमोल महाराज पांचाळ म्हणाले, स्वमींनी ज्ञानरूपी अमूल्य ठेवा दिला असून त्याचा प्रसार प्रचार करणार असल्याचे अमोल महाराज यांनी सांगितले.

गुजरात के विश्वकर्मा प्रचारक, विश्वकर्मा साहित्य भारत, विश्वकर्मा वैदिक पत्रिकाचे मयूर मिस्त्री, भेरूलाल लोहार, अखंड विश्वकर्मा ब्राह्मण कल्याण समितीचे संस्थापक पं. संतोष आचार्य सर्व पदाधिकारी, लेखक पं. घनश्याम व्दिज, व डिजीटल गुरूकुलचे सर्व सदस्य अखिल भारतीय तांबट जनशक्ती प्रतिष्ठानचे भारत रेघाटे सत्यप्रकाश आढवळकर पंढरपूर, विश्वकर्मा लोहकार ,काष्ठकार, ताम्रकार, शिल्पकार.व सुवर्णकार महाराष्ट्रासह जिल्ह्यातील अकोले राजूर परिसरातील विश्वकर्मा समाजातील सर्व भक्त व शिष्यगण तालुक्याच्या सभापती उर्मिला राऊत यांनी स्वामीज प्रती भावना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.