अहमदनगर : शाळा सुरू; मुलांनी बहरले शाळेचे प्रांगण

कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी
अहमदनगर : शाळा सुरू; मुलांनी बहरले शाळेचे प्रांगण
अहमदनगर : शाळा सुरू; मुलांनी बहरले शाळेचे प्रांगण sakal

अहमदनगर : राज्य सरकारच्या आदेशानुसार आज जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या. शिक्षकांनी फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गेल्या दोन वर्षांपासून रुक्ष वाटणारे शाळेचे प्रांगण आज मुलांमुळे फुलून गेले. मुलांनीही शिक्षकांना प्रत्यक्ष भेटत आनंद व्यक्त केला. मागील वर्षी, तसेच यंदा पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आज पहिला दिवस होता. त्यामुळे मुलांनी आनंद व्यक्त केला.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आली होती. कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने सरकारने मागील काही दिवसांपासून प्रारंभी महाविद्यालये, मग पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले होते. प्राथमिक शाळा मात्र बंद होत्या. आता कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी झाल्याने पहिलीपासून सर्व वर्ग भरविण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या.

अहमदनगर : शाळा सुरू; मुलांनी बहरले शाळेचे प्रांगण
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी करताना मुलांना साबणाने हात धुवायला लावणे, तापमान तपासणे, मास्कचा वापर, आजारी मुलांबाबत विशेष दक्षता, अशी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यात आला. आपला पाल्य शाळेत पाठविण्याबाबत पालकांकडून संमतिपत्र भरून घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com