धनगर समाजाचे आरक्षणासाठी नेवासेत तहसीलदारांना निवेदन

सुनिल गर्जे
Wednesday, 23 September 2020

धनगर समाजाला एस. टी. मध्ये आरक्षण देऊन समाजाला न्याय द्या. या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने नेवासे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

नेवासे (अहमदनगर) : धनगर समाजाला एस. टी. मध्ये आरक्षण देऊन समाजाला न्याय द्या. या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने नेवासे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आलेल्या निवेदनात, धनगर समाजाने एस. टी. मध्ये समावेश करण्यात यावा. या मुख्य मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने व मोर्चे काढले. यापूर्वीच्या सरकारने सकारात्मक विचार करून पाठ पुरवठा केला. परंतु तरीही समाजाच्या आरक्षणाबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या दिसत नाहीत.

महाविकास आघाडी सरकारने धनगर समाजाच्या भावना समजून घेवून आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करून धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण मागणी मंजूर करून धनगर समाजास एस. टी. आरक्षण देवून समाजास न्याय द्यावा अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी धनगर समाज आरक्षण कृती समितीचे नामदेव खंडागळे, लक्ष्मण दाणे, शशिकांत मतकर, किशोर भुसारी, किशोर विखे, गोरक्षनाथ शेंडगे, विठ्ठल डोईफोडे, नामदेव खोसे, शंकर शिंदे उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement to Tehsildar in Nevasa for reservation of Dhangar Samaj