
संगमनेर: घुलेवाडी (ता. संगमनेर) येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात संग्राम बापू महाराज भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १८) सकाळी संगमनेर शहरातील बसस्थानकासमोर नाशिक–पुणे रस्त्यावर सकल हिंदू समाजातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी परिसर जोरदार घोषणांनी दणाणून गेला.