

Supporters celebrate the arrival of late Gopinath Munde’s statue with festive joy and fireworks in Beed district.
Sakal
पाथर्डी: गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे रविवारी (ता. ९) मध्यरात्री शहरात आगमन झाल्यानंतर मुंडे समर्थकांनी दिवाळी साजरी केली. या पुतळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. शहराच्या शेवगाव रोड लगत माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या संकल्पनेतून भव्य असे स्व. मुंडे जॉगिंग पार्क नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आले. या जॉगिंग पार्कमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.