ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल जाणून घ्या; त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळवा घरबसल्या

The story about facilities available to senior citizens and the documents required
The story about facilities available to senior citizens and the documents required

अहमदनगर : ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे राहणीमान सुसह्य व्हावे, त्यांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार यांची जाणीव व्हावी म्हणून सरकारने अधिनियम केला. हा अधिनियम महाराष्ट्रात 1 मार्च 2009 पासून लागू करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या. त्याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आवश्‍यक असते. या प्रमाणपत्रासाठी अनेक नागरिकांना सतत सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारावे लागतात. यातून वेळ तर जातोच शिवाय पैसेही खर्च होतात. मात्र, हे प्रमाणपत्र सहज घरबसल्याही उपलब्ध करता येते. यासाठी आपले सरकारवर नोंदणी करून दिलेली प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. 

ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे 
ओळखपत्र :
पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, निमशासकीय कार्यालयाचे ओळखपत्र, रोजगार हमीचे ओळखपत्र यापैकी कोणतेही एक 
पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, रेशन कार्ड, भाडे करारपत्र, टेलिफोन बिल, लाईट बिल, पाणीपट्टी, 7/12/, 8अ यापैकी एक, नाव असलेल्या मतदान यादीचे पान, प्रॉपर्टी टॅक्‍स पावती, ड्रायव्हिंग लायसन्स, खरेदीखत यापैकी कोणतेही एक 
वयाचा पुरावा : जन्म दाखला, बोनाफाईड, शाळा सोडल्याचा दाखला, प्राथमिक शाळेतील नोंद, सेवा पुस्तक (सरकारी किंवा खासगी) यापैकी कोणतेही एक 
वरील सर्व कागदपत्रे स्वत: सत्यप्रत केलेले. (प्रत्येक कागदावर स्वत:ची सही) 

वरील सर्व कागदपत्रे ऑनलाइन दिल्यानंतर सात दिवसांच्या आत ज्येष्ठ नागरिकचे प्रमाणपत्र आपले सरकारच्या स्वत:च्या अकाउंटवर येते. यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Login या लिंकवर लॉगइन करा. 

असे करा लॉगइन 
वरील लिंकवर क्‍लिक केल्यानंतर New user? Register here येथे क्‍लिक करा 
तिथे पुढील प्रक्रिया कशी करायची यासाठी डेमो दिलेला आहे. त्यावर क्‍लिक करून सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करून घरी बसल्या प्रत्येक संबंधित प्रमाणत्रासाठी अर्ज करता येतो. यासाठी लागणार शुल्कही त्यात सांगितले जात आहे. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर प्रमाणपत्र कधी मिळणार याचा कालावधीही तिथे दिलेला आहे. 

ज्येष्ठ नागरिकांच्या योजना : ज्येष्ठ नागरिकांसाठी "वृद्धाश्रम' योजना (सर्वसाधारण वृद्धाश्रम) : अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, म्हणून सरकारने वृद्धाश्रम ही योजना सुरू केली. प्रवेशासाठी गरजू ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित संस्था यांच्याकडे संपर्क साधावा. 

हेही वाचा : ११० फूट खोल विहीरीत वीज कोसळली अन्‌ क्षणातच...
ज्येष्ठ नागरिकांसाठी "वृद्धाश्रम' योजना :
ज्येष्ठ नागरिकांसाठी "वृध्दाश्रम' ही योजना आहे. या योजनेव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये काही अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून बागबगीचा, वाचनालय, दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी सुविधा, बैठे खेळ अशा सर्व सोयींनी युक्त असे "वृद्धाश्रम' ही योजना आणली. या योजनेंतर्गत सरकारने 31 जिल्ह्यांमध्ये 5 एकर जागेवर सुसज्ज मातोश्री वृद्धाश्रम बांधलेले आहे. राज्यात सद्य:स्थितीत 23 मातोश्री वृद्धाश्रम सुरू असून प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाची प्रवेशितांची मान्य संख्या 100 इतकी आहे. 

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे 
- ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास भाड्यात (राज्य परिवहन महामंडळ) सवलत मिळण्यासाठी ओळखपत्र 
- संजय गांधी निराधार योजना 
- श्रावणबाळ योजना (राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना) : या योजनेंतर्गत 65 वर्षांवरील स्त्री आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येतो. या योजना संबंधित तालुक्‍याचे तहसीलदार यांच्यामार्फत राबविण्यात येतात. 
(स्रोत : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, राज्य सरकार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com