esakal | भाजप संचलन समितीस गोंदकर जबाबदार
sakal

बोलून बातमी शोधा

Story of BJP election in Shrirampur taluka

भाजपासाठी आम्ही स्थानिक पातळीवर काम करणारे पिढीजात कार्यकर्ते आहोत. आमचा कुणी गैरसमज करुन घेईल आणि त्यानुसार आम्ही वागतो किंवा बोलतो असे म्हणणे निव्वळ हास्यास्पद आहेत.

भाजप संचलन समितीस गोंदकर जबाबदार

sakal_logo
By
आनंद गायकवाड

श्रीरामपूर (अहमदनगर) : भाजपासाठी आम्ही स्थानिक पातळीवर काम करणारे पिढीजात कार्यकर्ते आहोत. आमचा कुणी गैरसमज करुन घेईल आणि त्यानुसार आम्ही वागतो किंवा बोलतो असे म्हणणे निव्वळ हास्यास्पद आहेत. वादग्रस्त नियुक्त्या प्रदेशाने केल्या असतील तर प्रदेशालाही नावे जिल्हाध्यक्षांनीच सुचविली आहेत. 

प्रदेश पदाधिकाऱ्यांना येथील सक्रिय कार्यकर्ते कोण आहेत. त्याची माहिती देखील नसेल. त्यामुळे भाजपाचे उतर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचा निर्वाळा हास्यास्पद असुन केवळ व्यक्तीद्वेषातून सक्रिय भाजपा संघटना मोडीत करण्याचे कार्य केले आहे. पक्ष संघटन कायम ठेवण्यासाठी भाजपा श्रीरामपूर संचलन समिती स्थापनेसाठी गोंदकर यांनीच भाग पाडले. कार्यकत्यांचे पाठबळ नसलेल्यांच्या ताब्यात पक्षाची धूरा देतांना त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांना चुकीची माहिती देत दिशाभूल केल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक किरण लुणीया यांनी केला आहे.

यासंदर्भात नगरसेवक लुणिया यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात आम्ही येथील प्रमुख कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष गोंदकर यांना शिर्डीत 14 जुनला भेटलो व त्यांना स्थानिक परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी आम्हाला सर्वांना विश्वासात घेवूनच मी पुढे जाईल व नियुक्त्यासंदर्भात निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी येथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली नाही. 

स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही. केवळ मोजक्या लोकांच्या खोटया माहितीनुसार पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाचा गैरफायदाच घेत नियुक्त्या केल्या. आपण तत्कालीन भाजपा शहराध्यक्ष असतांना पदाधिकारी निवडीसंदर्भात गोंदकर यांनी आपल्यालाही अंधारात ठेवले. साधा फोन देखील केला नाही. जिल्हयातील सर्वाधिक सक्रिय भाजपा संघटना जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी मोडीत काढली आहे. केवळ व्यक्तीद्वेषातुन संघटनेतील काहींना जिल्हा कार्यकारीणीत पदे दिली. त्यामुळे गोंदकर यांनी पक्षाची धुरा सोपविलेल्या पदाधिकार्यांच्या जोरावर आमच्या सारखा मेळावा घेवून दाखवावा, असे आव्हान प्रसिद्धी पत्रकात लुणिया यांनी नमुद केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top