इंग्रज पंडीत नेहरूंना तुरुंगातही पुरवायचे साबण, बेड, मच्छरदाणी

The story of Pandit Nehru historical book Discovery of India
The story of Pandit Nehru historical book Discovery of India

नगर : जिल्ह्याला ऐतिहासीक वारसा आहे. या जिल्ह्यातील राजकारण व समाजकारण नेहमी चर्चेत असते. येथील भुईकोट किल्ल्याला सुमारे ५०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. मोगलांच्या काळापासून या किल्ल्याचा वापर राजघराण्यातील लोकांना तसेच राजकीय नेत्यांना बंदी ठेवण्यासाठी केला जात होता.

महाराणी येसूबाई व त्यांची मुलगी भवानीबाई यांना याच किल्ल्यात बंदी करून ठेवले होते. इंग्रजांविरूद्ध मोठा रणसंगर सुरू झाला होता. १९४२ ची चले जाव चळवळ जोर धरीत होती. तिचे नेतृत्व करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांना बंदी म्हणून ठेवले होते. नेहरु यांनी याच किल्ल्यात ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’नावाचा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला.

अहमदनगरमधील भुईकोट किल्ला १४९० मध्ये बांधल्याचा उल्लेख सापडतो. किल्ल्याभोवती बांधलेला तट मातीचा होता. नंतर १५६० मध्ये या किल्ल्याचे पक्के बांधकाम करण्यात आले. मोगलांच्या काळापासून या किल्ल्यात राजकीय बंदी ठेवण्यात येऊ लागले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे १९४२ ते १९४५ या कालावधीत पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नरेंद्र राव यांच्यासह इतर १२ नेत्यांना ‘चले जाव’आंदोलनात येथे बंदीवासात ठेवण्यात आले होते. यावेळी बंदीवासात असताना पंडित नेहरु यांनी ‘डिस्कवरी ऑफ इंडीया’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. 

नेहरु यांनी हॅरो व केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १९१२ मध्ये बॅरिस्टर पदवी घेतली. पण भारतात परतल्यानंतर काय करायचे या संभ्रमात ते होते. त्यावेळी त्यांना गांधीजी यांनी सल्ला दिला. त्या सल्ल्याने त्यांच्या विचारांची दिशा बदलली. वडिलांची चांगली चाललेली प्रॅक्टिस त्यांना वारसा म्हणून मिळत होती. मात्र, त्यांनी त्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली.

१९१२ मध्ये ते काँग्रेसशी जोडले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकर्‍यांचा मोर्चा त्यांनी काढला. १९२८ मध्ये सायमन कमिशनविरोधात निदर्शने करताना ते जखमी झाले. १९३० मध्ये मीठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक झाली. सहा महिने ते तुरूंगात होते. १९३५ मध्ये अल्मोडा तुरूंगात असताना त्यांनी आत्मचरित्र लिहिले. आयुष्यात एकूण नऊ वेळा ते तुरूंगात गेले.

१९४२ मध्ये मुंबईत काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी जोरदार भाषण केले. त्यावेळी ‘करा वा मरा’चा नारा दिला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी नेहरूंसह प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली.

डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा शोध हा त्यांचा ग्रंथ मोठा ऐतिहासिक दस्तावेज मानला जातो. परंतु या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख आल्याने त्यांना राजकीय रोषाला सामोरे जावं लागलं होतं. नेहरू यांची सेवा करण्यासाठी राघो जंजिरे नावाचा कैदी होता. बंदी काळात त्याने नेहरूंची सेवा केली. नगरच्या स्वातंत्र्यसैनिकांना राजकीय पुढाऱ्यांना कैद केल्याची माहिती नव्हती. परंतु ही माहिती समजताच बाहेरही मोठ्या संग्रामाची तयारी सुरू झाली होती.

नगरचा हा किल्ला सध्या सैन्याच्या ताब्यात आहे. तो राज्य सरकारकडे देऊन त्याचे राष्ट्रीय स्मारक केले पाहिजे, अशी नगरकरांची मागणी आहे. नेहरूंनी वापरलेला बेड, त्यांच्यासाठी दिलेली मच्छरदाणी, साबणाचे खोके, त्यांनी वाचलेली पुस्तके जतन करून ठेवली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com