तुम्हाला काहीही झालेले नाही, दोन दिवसात तुम्ही बरे व्हाल म्हणत डॉक्टरांनी दिला आधार

शांताराम काळे
Tuesday, 17 November 2020

अकोले तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २४२१ असून त्यापैकी २३५३ मुक्त झाले तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अकोले (अहमदनगर) : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या २४२१ असून त्यापैकी २३५३ मुक्त झाले तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अकोले तालुका आरोग्य विभागाची त्यामुळे मोठी धावपळ उडाली. नोडल अधिकारी डॉ. शामकांत विठ्ठल शेटे यांनी स्वत: ला या कामात झोकून देत सामाजिक भावना उराशी बाळगून योग्य नियोजन केले. त्यामुळे सुमारे १८०० बाधित रुग्णांना दिलासा मिळाला. 

तुम्ही माझ्या कुटुंबातील आहेत. तुम्हाला काही झाले नाही दोन दिवसात तुम्ही बरे व्हाल असा विश्वास देत रुग्णाची चिडचिड, भीतीची मानसिकता बदलताना त्यांना कसरत करावी लागत होती. काही रुग्ण पळून जाण्याच्या विचारात तर काही सुविधा नाही म्हणून चला खाजगी रुग्णालयात, असे म्हणत तर नातेवाईक देखील समजदार भूमिका न घेता आरडा ओरडा करत अशा वेळी त्याचे कॉन्सलिंग करताना या तरुण डॉक्टराने आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून रुग्णांना शांत करून योग्य उपचार दिल्याने डॉ. शामकांत शेटे रुग्णाच्या मनात घर करून बसले आहेत. 

प्रथम चिडचीड, शिवीगाळ करणारे रुग्ण खडखडीत बरे झाल्यावर डॉक्टरांना गुच्छ देऊन धन्यवाद म्हणण्याला विसरले नाहीत. एकावेळी १०० रुग्णांना कवेत ठेवून त्यांच्यावर उपचार करणेसोबत आपल्या कर्मचार्ऱ्यांची काळजी घेणे, त्यांना बाधा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे ही डॉ. शामकांत शेटे यांची अग्निपरीक्षा होती. मात्र ते त्यात पास झाले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोव्हीड काळात त्यांची नोडल अधिकारी (सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली) त्याच्या कामाचा अनुभव पाहता वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पेलली सुद्धा. पहिल्या टप्प्यात रुग्ण वाढले नी आकडा ५०० वर गेला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.

मात्र नोडल अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार व सर्व आरोग्य टीम यांनी तातडीने नियोजन करून तसेच सिव्हिल सर्जन यांचेकडून औषधें उपलब्ध करून तसेच अगस्ती सहकारी साखर कारखाना यांचेकडून १०० बेड व चार लाखाचे औषधें उपलब्ध करून रुग्णाची विनामोबदल्यात सोय व उपचार करण्यात आले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना देखील धीर आला.

२४ तास सेवा देताना डॉ. शेटे यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र अनुभव व ज्ञानाच्या भांडवलावर त्यांनी परिस्थिती हाताळली. त्यामुळे जे रुग्ण खाजगी रुग्णालयात चला म्हणत होते तेही जमिनीवर आले त्यांनी तातडीने रुग्णांना खानापूर कोव्हीड उपचार केंद्रात दाखल केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of Shamkant Shetty treating a corona patient in Akole taluka