esakal | कोरोना रुग्ण वाढल्याने पारनेर तालुक्यातील 21 गावांत पुन्हा लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्ण वाढल्याने पारनेर तालुक्यातील 21 गावांत पुन्हा लॉकडाउन

तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे 21 गावांत पुन्हा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे.

कोरोना रुग्ण वाढल्याने पारनेर तालुक्यातील 21 गावांत पुन्हा लॉकडाउन

sakal_logo
By
मार्चंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील धोत्रे येथे किराणा, रेशन दुकानदारासह सेवा संस्थेचा अध्यक्षही कोरोनाबाधित (Corona) आढळल्याने रविवारी घरोघरी जाऊन चाचणी करण्यात आली. त्यात 40 बाधित आढळून आले. तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे 21 गावांत पुन्हा कडक लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा: पारनेर येथे अप्रकाशित गिरिदुर्ग 'भोरवाडी' किल्ल्याचा शोध

तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काही गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी उपाययोजनांसह कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर देवरे यांनी तालुक्यातील २१ गावांत सात दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे. गरज भासल्यास त्यात वाढही करण्यात येणार असल्याचे देवरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: पारनेर तालुक्‍यात २० हजार एकर जमिनीचा गैरव्यवहार

तालुक्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्‍वर, वडगाव गुंड, शिरसुले, रायतळे, लोणी मावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, जवळा, हत्तलखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी, सावरगाव व वाळवणे ही गावे लॉकडाउन करण्याचे आदेश तहसीलदार देवरे यांनी दिले आहेत. या गावांमध्ये शंभर टक्के कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.

हेही वाचा: पारनेर पालिकेची कचऱ्यातून कमाई, कंपोस्ट खत बनवून विक्री

कोरोना वाढत असल्याने 21 गावांत व परिसरात दशक्रिया विधी, लग्न, पूजा, उद्‍घाटने व इतर कार्यक्रमांसाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे यापुढे जाहीर कार्यक्रमांना पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. यापुढे बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक आहे. तसेच विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर

loading image