
अहिल्यानगर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सीताराम सारडा विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून केला. मंगवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मुस्तकीन तन्वीर शेख (वय १५) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.