Student Protest : शिक्षक गुंतले मोबाईलमध्ये; विद्यार्थ्यांचा पंचायत समितीवर मोर्चा

दुर्गम भागातील एकदरे गावातील ग्रामस्‍थ संतप्त.
Student Protest
Student Protest sakal

अकोले - अतिदुर्गम एकदरे गावातील जिल्हा परिषद शाळेस चार वर्ग असून एकच शिक्षक आहे. असलेला शिक्षकही कायम मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, असा आरोप करत विद्यार्थी व ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीवर मोर्चा काढला. जोपर्यंत शिक्षक देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला.

Student Protest
Ahmednagar : बालकांच्या अडचणी समजून घ्या; भाग्यश्री पाटील

अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या एकदरे गावात पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. त्यात ५० विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दोन शिक्षक. त्यातील एक रजेवर गेले तर दुसरे शिक्षक शिकवण्याऐवजी मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. ज्ञानार्जन करण्याऐवजी शाळेत आल्यावर सर्व मुले कोंडवाड्याप्रमाणे एकत्र करतात.

Student Protest
Ahmednagar Crime कोपरगाव लव्ह जिहाद प्रकरण, आरोपी मौलवीला पोलिसांनी केले गजाआड

चौथीच्या विद्यार्थ्याला पहिलीचा धडा वाचावयास सांगून शिक्षक मोबाईल काढून पाहत बसतात. याबाबत तालुक्याचे लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी भेटून निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची विनंती केली, मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी विद्यार्थी पालक यांनी अकोले पंचायत समितीवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिक्षक दिल्याशिवाय इथून हलणार नाही, असे सांगत आंदोलन केले. शिक्षकांवर कारवाई व नवीन दोन शिक्षकांच्या ऑर्डरचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन स्थगित झाले.

गेल्‍या अनेक दिवसांपासून शिक्षक नसल्याने, असणारे शिक्षक मोबाईलमध्ये दंग असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली आहे. याबाबत आमदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधूनही उपयोग झाला नाही, मग आम्ही पंतप्रधानांकडे जायचे का ? एका बाजूला देश विकासाचे स्वप्न पाहत आहे तर दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आज आम्ही आंदोलन केले असून दोन शिक्षक देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करत आहोत.

-विकास भांगरे, सरपंच, एकदरे

Student Protest
Ahmednagar Crime News : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला, भाजप नगरसेवकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा; चौघे ताब्यात

जिल्ह्यातून दोन शिक्षक देण्यात आले होते. पैकी एक जण न्यायालयात गेला तर दुसऱ्याचे प्रमोशन झाल्याने तो दुसऱ्या शाळेत गेला. त्यानंतर आम्ही तातडीने दोन शिक्षक दिले. त्यापैकी एका शिक्षकने कुटुंब आजारी असल्याने रजा टाकली तर दुसरा शिक्षकाने मोबाईल खेळत असल्याने ग्रामस्थांनी तक्रार केली. उद्या दोन शिक्षक पाठवणार आहोत व संबंधित शिक्षकावर कारवाई करणार आहोत.

- राजेंद्र खताळ, गट शिक्षण अधिकारी, अकोले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com