
शासनाच्या नियमानुसार सध्या शाळेचे 11 वी व बारावीचे कनिष्ठ महाविद्यालय भरते व दुपारी नववी ते 10 वीचे विद्यार्थी येतात. त्यांची दोन शिफ्टमध्ये व्यवस्था केली आहे. परंतु, विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
कोल्हार (अहमदनगर) : नूतनीकरणामुळे पालटले रुपडे पण कोरोनामुळे विद्यार्थी फिरकेनात शाळेकडे, अशी स्थिती रयत शिक्षण संस्थेच्या येथील न्यू इंग्लिश स्कूलची झाली आहे. 11 लाख रुपये खर्चून शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व रंगकाम केले आहे. परंतु, विद्यार्थ्यांविना वर्गाच्या खोल्या रिकाम्या पडल्यामुळे शाळेचा परिसर सुनासुना दिसत आहे. 11 लाखात इमारतीच्या स्वतंत्र परंतु, परस्परांशी संलग्नित असलेल्या पश्चिमेकडील १४ वर्ग खोल्यांच्या दुमजली इमारतीच्या छताचे पत्रे बदलले. खिडक्यांची दुरुस्ती केली, प्लास्टर केले. 100 फुट लांबीची भिंत नवीन बांधली. फरशीचे काम विचाराधीन असल्याचे प्राचार्य एस. के. सोनवणे यांनी सांगितले.
हे ही वाचा : कोपरगावच्या पाण्याचा ताळेबंद सादर करा, जिल्हाधिकारी भोसलेंचे आवाहन
शासनाच्या नियमानुसार सध्या शाळेचे 11 वी व बारावीचे कनिष्ठ महाविद्यालय भरते व दुपारी नववी ते 10 वीचे विद्यार्थी येतात. त्यांची दोन शिफ्टमध्ये व्यवस्था केली आहे. परंतु, विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. 11 वी व 12 वी च्या 57 विद्यार्थ्यांपैकी अवघे 12 विद्यार्थी येतात. नववीच्या दिवसाआड निम्म्याने 121 पैकी 15 व दहावीचे 90 पैकी 30 विद्यार्थी सध्या येत आहेत. 11 वी व 12 वीची एकूण संख्या 57 असल्याने त्यांना नियमित ठेवण्यात आले आहे. वर्गामध्ये सॅनिटायझरची फवारणी केली जाते. तसेच सोशल डीस्टसिंग ठेवले जात आहे.