कान्हुर पठार पतसंस्थेचे यश उल्लेखनीय : काँग्रेसचे विनायक देशमुख 

सनी सोनवाळे
Tuesday, 15 December 2020

राज्यात पतसंस्था चळवळीत कान्हुर पठार पतसंस्थेचे नाव प्राधान्याने घेतले जाते. संस्थेच्या प्रगतीचा हा एक मापदंड म्हटल्यास वावगे होणार नाही.

अहमदनगर : राज्यात पतसंस्था चळवळीत कान्हुर पठार पतसंस्थेचे नाव प्राधान्याने घेतले जाते. संस्थेच्या प्रगतीचा हा एक मापदंड म्हटल्यास वावगे होणार नाही.

जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांची तुलना केल्यास ‘कान्हूर पठार’ पतसंस्थेचे यश उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी केले.

पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार पतसंस्थेच्या गुलमोहर शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करून नूतनीकरण करण्यात आले. या शाखेस देशमुख यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक दिलीपराव ठुबे यांनी देशमुख यांचा सत्कार केला व संस्थेच्या कामकाजाविषयी माहीती दिली.

देशमुख म्हणाले, संस्थेच्या १७ शाखांपैकी १२ शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत आहेत. सचोटी, प्रामाणिकपणा, आर्थिक शिस्त व राजकारण विरहित कामकाज यामुळेच संस्थेने सभासदांचा व प्रामुख्याने नगर शहरातील ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या ठेवींचा वाढता आलेख याचे घोतक आहे.

ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रशासन उत्तमरीत्या सुरू आहे शहरातील दोन शाखेच्या माध्यमातून संस्थेने नगरकरांचा विश्वास कमविला आहे भविष्यात अजुनही शाखा शहरात वाढवाव्यात. ठुबे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे होत असलेल्या बदलांना सहकारासह सर्वच क्षेत्रांना सामोरे जावे लागत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा देखील संस्थने ऑनलाइन द्वारे घेतली होती.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The success of Kanhur Patar Credit Union is remarkable