ऊस बागायतदार वळले मसाल्याच्या शेतीकडे, आठ महिन्यात मिळतात एवढे लाख

Sugarcane growers do this farming
Sugarcane growers do this farming

नेवासे : कोरोनामुळे आयुर्वेदिक पिकांचे (मसाला वर्गीय) महत्व वाढत आहे. यापूर्वी चुकून दिसणारे मसाल्याचे पदार्थ आता हमखास दिसतात. शेतकर्यांनीही या पिकाकडे मोर्चा वळवला आहे. नेवासे तालुक्यात अनेक शेतकरी ऊस, खरीपातील पिके यांना फाटा देत आहेत.

आत्तापर्यंत तालुक्यात अडीचशे एकराहून अधिक क्षेत्रावर आद्रक लागवड झाली आहे. येत्या काळात आल्याचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार आहे. नेवासे तालुका हा उसाचे आगार म्हणून ओळखले जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाई, हुमणी वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकर्यांपचा खर्च अधिक व उत्पन्न कमी यामुळे आर्थिक मेळ बसत नसल्याने अनेक शेतकरी आद्रक लागवड, फळबागांकडे वळत आहे.

चालू वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक औषधांचे महत्व पटून दिले आहे. यामध्ये आले पिकांचाही समावेश होत आहे. त्यातच कोरोनामुळे आले पिकांचे महत्व अधिक वाढले आहे. तसेच जळवळच असलेल्या औरंगाबाद बाजारात गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये आले पिकांना चांगले दर मिळाले आहे.

येत्या काळातही आले पिकाला चांगले दर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नेवासे तालुक्यातील पन्नासहून अधिक शेतकर्यांनी सुमारे अडीचशे एकराहून अधिक क्षेत्रावर आले पिकाची लागवड केली आहे. यामध्ये जळके बुद्रुक-खुर्द, देवगड फाटा, भेंडे, देवगाव, रांजणगाव देवी, शिरसगाव, देवसडे, सोनई, भानसहिवरे, बेलपिंपळगाव या गाव व शिवाराचा समावेश आहे.

मे-जून महिन्यामध्ये आले बेण्याची लागवड केली आहे. त्यासाठी गंगापूर, औरंगाबाद, श्रीरामपूर याभागातून प्रती क्विंटल पाच हजार रुपये याप्रमाणे बेणे खरेदी करून लागवड केली आहे. साधारपणे एकरी मशागत, लागवड, फवारणी व काढणी असा पन्नास हजार ते जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. आल्याच्या काढणीनंतर बाजारात चांगले दर मिळाल्यास खर्च वजा जाता एकरी तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. यामध्ये किमान आठ-नऊ महिन्यांत हे उत्पन्न मिळत असल्याने आले पिकांकडे शेतकरी वळत आहेत.

आले बेण्यातून मिळते चांगले उत्पन्न

दरवर्षी अनेक शेतकरी आले लागवड करत असल्यामुळे आले बेण्यायाची अधिक गरज असते. लागवड करून उत्पादन घेतल्यानंतर त्याचा वाण दुसऱ्या वर्षी आले बेणे म्हणून केला जातो. या बेण्याला बाजारात सात ते आठ हजार रुपये टन एवढा दर मिळतो. एकरी साधारणपणे सात ते आठ टन बेणे लागते. बेणे विक्रितून साधारण पाने 50 ते 60 हजार रुपये मिळतात. त्यामुळे अनेक शेतकरी बेणे विक्रीतूनही चांगले उत्पन्न मिळत असल्याचे बेणे विक्रेते व प्रयोगशील शेतकरी जलिंदर देशमुख व बबन पिसोटे यांनी सांगितले.

आले शेती फायद्याची

 "उसापेक्षा कमी खर्च, कमी पाणी, उत्पादनाचा कमी कालावधी व चांगला बाजारभाव यामुळे आले शेती फायद्याची ठरत आहे. माझे अनेक शेतकरी मित्रही आले शेतीकडे वळले आहे. असे भेंडे येथील प्रयोगशील युवा शेतकरी किशोर मिसाळ म्हणाले. 

आधुनिक शेती काळाची गरज

"आधुनिक व प्रयोगशील शेती काळाची गरज आहे. आले शेतीसोबत शेतकर्यांनी मसालावर्गीय पिकेही घ्यावी, यासाठी कृषी विभाग आवश्यक ते मार्गदर्शन करेल, असे  नेवासे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय डमाळे म्हणाले. 
 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com