पोलिस करायचा जाच म्हणून ठाण्यासमोरच घेतलं पेटवून

Suicide in front of the police station due to police harassment
Suicide in front of the police station due to police harassment

श्रीरामपूर ः एमआयडीसीतील पोलीस चौकीसमोर अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतलेल्या दत्तनगर येथील नदीम पठाण याचा काल सायंकाळी लोणी येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळूनच नदीमने आत्महत्या केली. संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी करीत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत मृतदेह रुग्णालयात पडून होता. वीस तास होवूनही त्याचा अंत्यविधी न झाल्याने दत्तनगर येथे तणावाचे वातावरण होते. 

रमजान ईदच्या दिवशी (ता. २५) तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम पठाण या २८ वर्षीय तरुणाने पोलीस चौकीसमोर अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. त्यात तो ८० टक्क्याहून अधिक भाजला होता. लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार चालू होते. काल संध्याकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. आज सकाळी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात नातेवाईकांनी नकार दिला.

पोलिस चौकीतील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवून निलंबित करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली. कारवाई करेपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. या प्रकरणातील संबंधीत पोलिसाविरुद्ध गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. दीपाली काळे, उपअधीक्षक राहुल मदने, निरिक्षक श्रीहरी बहिरट यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यातून मार्ग निघाला नव्हता. अखेर नदीमच्या आईचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलिस अधीक्षक काळे यांनी दिल्यानंतर नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी लोणीला रवाना झाले.पोलीस प्रशासन त्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

दरम्यान, आज सकाळी आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर, अहमद जहागीरदार, बाबासाहेब दिघे, राहुरीचे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद, आरपीआयचे राजाभाऊ कापसे, भीमराज बागुल, सरपंच सुनील शिरसाठ, चांगदेव ढोकचौळे, नानासाहेब शिंदे, प्रेमचंद कुंकलोळ यांनी नदीमच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com