Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

Sujay Vikhe Patil and Vivek Kolhe Meet Amid Political Buzz: खासदारकीची खुर्ची हवी’; रामगिरी महाराजांच्या विधानाने विखे-कोल्हेंच्या कार्यक्रमात हशा
Maharashtra Politics Ramgiri Maharaj Says Sujay Vikhe Patil Wants the MP Chair as Vivek Kolhe Offers His Seat at an Event

Maharashtra Politics Ramgiri Maharaj Says Sujay Vikhe Patil Wants the MP Chair as Vivek Kolhe Offers His Seat at an Event

sakal

Updated on: 

-सतीश वैजापूरकर

शिर्डी: जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने यापूर्वी सहसा एकत्र न येणारे नेते एकमेकांसोबत गुजगोष्टी करू लागले. राजकीय पटलावर सहमतीचे वारे वाहू लागले. त्याचाच एक भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील आणि आमदार विवेक कोल्हे राहाता तालुक्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. या कार्यक्रमाच्या सुरवातीलाच महंत रामगिरी महाराजांच्या एका विधानाने किस्सा कुर्सी का चांगला रंगला आणि चर्चेचा विषय ठरला. सत्तेच्या वेगवेगळ्या खुर्च्या आणि त्या निमित्ताने आकाराला येणारी नवनवी राजकीय समीकरणे पुन्हा एकदा समोर आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com