
Nagar : शेळकेंकडे वेगळे काही करण्याची जिद्द : डॉ. विखे
शिर्डी : जागतिक पातळीवर लौकीक असलेल्या मॅकडोनाल्डसची येथे आज सुरू झालेली शाखा ही शिर्डीच्या नावलौकीकात भर टाकणारी ठरेल. येथील उद्योजक अभय शेळके यांची कार्यपध्दती, कौशल्य आणि दृष्टिकोन यामुळे हे शक्य झाले. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्यांच्याकडे असल्याने हा योग आला, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या पुढाकारातून येथे सुरू करण्यात आलेल्या मॅकडोनाल्डसच्या शाखेचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गेवराई (जि. बीड) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंग पंडित, मॅकडोनाल्डचे संचालक निशित पांडे, सचिन दामले, विनय हळंबी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलिस उपअधीक्षक संजय सातव, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, माजी नगराध्यक्ष योगीता शेळके, साईसंस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, डॉ. पंडित शेळके, धनंजय शेळके, जितेंद्र शेळके, सुरेश बनकर, विष्णुपंत कुंजर, अॅड. शिवाजी शेळके, विलास शेळके, संजय शेळके आदी उपस्थित होते.
अभय शेळके म्हणाले, मॅकडोनाल्डची शाखा कमीत कमी वेळात सुरू करणे शक्य झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून विविध समाजघटकांकडून ही शाखा लवकर सुरू करा, असा आग्रह सुरू होता. महसूमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार
डॉ. विखे पाटील यांच्या पाठबळामुळे आपण ही झेप घेऊ शकलो.
पांडे म्हणाले, शिर्डीचे महत्त्व, विस्तार आणि प्रगती लक्षात घेवून आम्ही ही शाखा सुरू केली. याभागात आणखी काही शाखा सुरू करण्याचा आमचा विचार आहे. ग्रीन अॅण्ड क्लिन शिर्डीचे जितेंद्र शेळके यांनी सूत्रसंचालन केले. उद्योजक धनंजय शेळके यांनी स्वागत केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, गौतम बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, जनार्दन स्वामी आश्रमाचे उपाध्यक्ष विलास (आबा) कोते, प्रमोद गोंदकर यांच्यासह विवीध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.