
शिर्डी : माझी जन्मभूमी कर्नाटक आणि कर्मभुमी मुंबई आहे. मला मराठी बोलता यायला हवे, त्यासाठी प्रयत्न करायला हवा. पहेलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यास बंदी हे योग्य पाऊल आहे. हिंदू, हिंदूत्व आणि सनातन धर्माची शिकवण धर्म, सेवा आणि कर्म ही आहे. आम्ही कधीही कुणाबरोबर आपणहून युध्द केलेले नाही. कुटुंबाला एकत्र बसून पाहता येतील, असे माझे चित्रपट आहेत. माध्यम कुठलेही असोत सर्वत्र असेच चित्रपट तयार व्हायला हवेत, असे मत हिंदी चित्रपट अभिनेता सुनील शेट्टी याने व्यक्त केले.