Ahmednagar : स्मशानातील सोन्यासाठी राख होतेय गायब?

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्रकार; अंधश्रद्धा, की सोन्या-चांदीची लालसा
Ahmednagar
Ahmednagar sakal

करंजी : करंजी (ता. पाथर्डी) महिलां अंत्यविधीनंतर राख गायब होण्याचे प्रकार येथे वाढले आहेत. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, की सोन्या- चांदीच्या लालसेपोटी असा प्रकार घडतो आहे, याबाबत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

एका महिलेचे चार दिवसांपूर्वी निधन झाले. दुपारी अंत्यसंस्कार करून सर्व नातेवाईक, ग्रामस्थ घरी गेले. दुसऱ्या दिवशी सावडण्यासाठी मृत महिलेचे कुटुंबीय व नातेवाईक ग्रामदैवत महादेव मंदिरासमोरील स्मशानभूमीत गेले.

त्यावेळी अर्ध्यापेक्षा जास्त रक्षा गायब असल्याचे लक्षात आले. मात्र तेथे याबाबत कोणी वाच्यता केली नाही. सावडण्याचा विधी झाल्यानंतर कुजबूज सुरू झाली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यापूर्वीही एका महिलेची रक्षा गायब झाल्याचे समोर आले. असे प्रकार वारंवार होत असल्याचे समोर आल्यामुळे, नेमका कशामुळे हा प्रकार होत असेल, या शंकेने ग्रामस्थ चिंतेत आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत व झाल्या प्रकाराबाबत संपूर्ण चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com