

MP Supriya Sule interacts with Sangamner cooperative members; praises their innovative and inspiring model of development.
Sakal
संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातील स्वच्छ व पारदर्शक कामातून देशाला दिशा दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये सहकारात शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम होत आहे. अद्ययावत साखर कारखाना, दूध संघ, बँक या सर्व संस्थांत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरावे, असे काम येथे आहे, असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.