सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्डला हवी ‘समृद्धी’

प्राजक्त तनपुरे; भूसंपादनास कमी दर दिल्यास काम करू देणार नाही
Surat Hyderabad Greenfield Expressway
Surat Hyderabad Greenfield Expressway sakal
Updated on

राहुरी : राहुरी मतदारसंघातून जाणाऱ्या सुरत-हैदराबाद (ग्रीनफिल्ड) अतिजलद महामार्गासाठी भूमी अधिग्रहण करताना समृद्धी महामार्गाच्या जमिनींसाठी दिलेल्या दराने मोबदला मिळाला पाहिजे. त्यापेक्षा कमी मोबदला देऊन, वेगळा न्याय दिल्यास शेतकऱ्यांसह महामार्गाला विरोध करू, असा इशारा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

Surat Hyderabad Greenfield Expressway
कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल

तालुक्यातील कानडगाव येथे नवीन वीज उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन तनपुरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे होते. त्यापूर्वी त्यांच्या हस्ते तांभेरे, चिंचविहिरे, सोनगाव, सात्रळ, धानोरे येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण करण्यात आले. शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, बाबूराव पटारे, जयराम गिते, नितीन गागरे, सागर मुसमाडे, भास्कर गाढे, अविनाश ओहोळ, दादासाहेब पवार, किशोर गागरे, डॉ. रवींद्र गागरे, सुभाष डुकरे, सोपान हिरगळ, मंजाबापू चोपडे, चांगदेव हारदे, गणेश कडू, मिलिंद अनाप उपस्थित होते.मंत्री तनपुरे म्हणाले, ‘‘मतदारसंघात सहा नवीन उपकेंद्रे उभारली. दोन उपकेंद्रांची क्षमता वाढवली. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनींची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर केली. २२५ नवीन रोहित्रे दिले.

Surat Hyderabad Greenfield Expressway
कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

त्यामुळे ऊर्जाविषयक पायाभूत सुविधा बळकट होणार आहेत. सत्तेचा वापर विकासकामांसाठी व सामान्य जनतेच्या हितासाठी करीत आहे. निळवंडे उजवा कालव्याच्या तालुक्यातील शेवटच्या टप्प्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. कालव्यांच्या कामांसाठी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह मी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे.’’

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात मागील पंधरा वर्षांतील ऊर्जाविषयक बॅकलॉग भरून काढण्याला प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील लघुवीज केंद्रांना विद्युत पुरवठा करण्यासाठी १३२/३३ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारणीचा मानस आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊन न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेची व्यापकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्य मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com