
कोपरगाव : येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या तनिष्क आफळे याने टाटा बिल्डिंग इंडिया निबंध स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. त्याचा नुकताच राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला टाटा बिल्डिंग इंडियातर्फे पालक दत्तात्रय आफळे यांच्यासह तनिष्क आफळे याला दिल्ली विमान प्रवास, निवास, भोजन, राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानपत्र, पदक, ३० हजारांचे गिफ्ट व्हाउचर देऊन सन्मानित करण्यात आले.