esakal | तनपुरे कारखाना विखेंच्या मदतीने कर्जमुक्त करणार, कर्डिलेंनी केला निर्धार
sakal

बोलून बातमी शोधा

The Tanpure factory will be debt free with the help of Vikhe, Kardilen decided

आज (गुरुवारी) देवळाली प्रवरा येथे नगरपालिकेच्या पुढाकाराने खासगी डॉक्टरांनी संचालित केलेल्या कोविड हेल्थ सेंटर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व डॉ. तनपुरे कारखान्यावर 350 नारळ रोपांचे वृक्षारोपण प्रसंगी राहुरी फॅक्टरी येथे आयोजित मेळाव्यात कर्डिले बोलत होते.

तनपुरे कारखाना विखेंच्या मदतीने कर्जमुक्त करणार, कर्डिलेंनी केला निर्धार

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : "पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील व जगातील उत्तुंग व्यक्तीमत्व आहेत. मागील सहा वर्षात त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून देश हिताचे निर्णय घेतले. खऱ्या अर्थाने सामान्य जनतेसाठी विविध योजनांद्वारे मोठे काम उभारले. यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त सेवा सप्ताहद्वारे समाजहिताची कामे करून, शुभेच्छा दिल्या जात आहेत." असे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

आज (गुरुवारी) देवळाली प्रवरा येथे नगरपालिकेच्या पुढाकाराने खासगी डॉक्टरांनी संचालित केलेल्या कोविड हेल्थ सेंटर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व डॉ. तनपुरे कारखान्यावर 350 नारळ रोपांचे वृक्षारोपण प्रसंगी राहुरी फॅक्टरी येथे आयोजित मेळाव्यात कर्डिले बोलत होते.

भाजपा नेते लक्ष्मण सावजी, प्रा. भानुदास बेरड, अरुण मुंडे, प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग संतोष लगड, नगराध्यक्ष सत्यजित कदम, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, रमेश पिंपळे, सुवर्णा जऱ्हाड, रवींद्र म्हसे, सुभाष गायकवाड उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, "कोरोना चे संकट काळात राज्य सरकारचे व्यवस्थापन नियोजन शून्य आहे. कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव आहे. सामान्य जनतेला व्यवस्थित आरोग्य सेवा मिळत नाही. तालुक्यात बारा लाख टन ऊस उभा आहे. राहुरी कारखाना चालू होणार नसता. तर, जिल्ह्यातील कारखान्यांनी कवडीमोल भावात ऊस लुटला असता. त्यामुळे, शेतकरी व कामगार हितासाठी बंद पडलेला राहुरी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून जिल्हा बँकेतर्फे मदत केली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने पुढील पंचवार्षिकमध्ये कारखाना कर्जमुक्त करु. कारखान्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ." असेही कर्डिले यांनी सांगितले. सुरेश थोरात यांनी आभार मानले.

संपादन - अशोक निंबाळकर