जंगलातील तरस आला गावात; नागरिकांच्या मदतीने डुकराची सुटका

शांताराम काळे
Saturday, 14 November 2020

राजूर परिसरात थंडी वाढली असतानाच जंगलातील प्राणी आता गावाकडे येऊ लागले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजता चितळ वेढा रस्त्याने एक तरास थेट राजूरकडे आला.

अकोले (अहमदनगर) : राजूर परिसरात थंडी वाढली असतानाच जंगलातील प्राणी आता गावाकडे येऊ लागले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजता चितळ वेढा रस्त्याने एक तरास थेट राजूरकडे आला.

गणपती मंदिर मागे असलेल्या झुडपात असलेल्या डूकरावर त्याने हल्ला केला. मात्र त्याच्या तावडीतून डुक्कर वाचले नी थेट मंदिराच्या पुढील बाजूने पळाले. त्यावेळी ग्रामस्थ फिरण्यासाठी या रस्त्याने जात असताना त्यांनी आरडा- ओरडा केला. त्यामुळे तरस पुन्हा आलेल्या वाटेने निघून गेले.

हेही वाचा : आता केंद्राकडूनच महाराष्ट्रावर कौतुकाची थाप; विरोधाला विरोध न करता कोरोनाच्या विषयावर तरी सहकार्याची भूमिका घ्या
जंगलात खायला नसल्याने बिबट्या, तरस गावाकडे येऊ लागल्याने नागरिकमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याबाबत लक्ष्य देण्याची गरज आहे. सध्या थंडी पडल्याने लोक फिरण्यासाठी उशिरा बाहेर पडतात. आज सकाळी ६ वाजता चितळ वेढा रस्त्याने तरास आले. ते थेट झुडपात बसलेल्या डुकरावर हल्ला करत एका मोठ्या डुकराला पकडले. पण इतर डुक्कर जिवाच्या आकांताने ओरडले त्याच वेळी आजूबाजूचे भटके कुत्रे एकत्र येत भुंकू लागले. फिरण्यासाठी गेलेले, संतोष पंडित व इतर चौघांनी ओरडा सुरू केल्याने तरस आपला जीव वाचवत रस्त्याने पळत सुटले.
 

सपंदान : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taras will be seen in the forest in Rajur in Akole taluka