
पारनेर : तौराल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दावोसमधील परिषदेत राज्य सरकारबरोबर उद्योग सामंजस्य करार केला. त्यानुसार आता ही कंपनी सुपे एमआयडीसीत पाचशे कोटींचा उद्योग उभारणार आहे. यामुळे सुमारे बाराशे तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. या कंपनीची चाकण येथे एक शाखा सुरू आहे.