esakal | 'ती'ने अनेकांना दाखविली ज्ञानाची वाट; स्वतः मात्र दररोज तुडवतात चिखल
sakal

बोलून बातमी शोधा

teacher manjushree tribhuvan pawar is running the school in difficult conditions

'ती'ने अनेकांना दाखविली ज्ञानाची वाट; स्वतः मात्र दररोज तुडवतात चिखल

sakal_logo
By
टीम-ईसकाळ


श्रीगोंदे (जि. अहमदनगर) :
बारा चिमुकल्यांना सोबत घेत एका गोठ्यात भरणाऱ्या शाळेला भव्य आणि बोलक्या इमारतीत स्थलांतरित करण्याचा सिंहाचा वाटा आहे तो तेथील शिक्षिका मंजुश्री चंद्रदत्त त्रिभुवन- पवार यांचा. स्वत:सह सहकारी शिक्षिका स्वाती गायकवाड यांनी त्या शाळेत जाण्यासाठी नीट रस्ताही नाही, पावसाळ्यात एक किलोमिटर अंतराचा शाळेपर्यंतचा प्रवास चिखल तुडवित करावा लागत असतानाही ज्ञानदानाचे काम चोखपणे बजाविले.


श्रीगोंदे-बाबुर्डी रस्त्यावरील रेल्वे फाटक क्र.९ जवळील मोरे, मखरे आणि पोटे यांच्या विखुरलेल्या वस्तिवरील चिमुकल्यांना ज्ञानाची कवाडे खुली व्हावीत म्हणून जिल्हा परिषदेने बाबुर्डी गेट नावाने २०१० मध्ये या शाळेची स्थापना केली. या शाळेपर्यंत पावसाळ्यात पोहचणे तसे कठीणच. जास्त पाऊस झाला तर शाळेपासून काही अंतरावर दुचाकी ठेवून पायपीट करत शाळेपर्यंत पोचावे लागते. परंतू, कसलाही त्रागा न करता शिक्षिका मंजुश्री त्रिभुवन यांनी शाळेतील स्थापनेपासून आजपर्यंत १२ पटावरुन २५ पटापर्यंत या शाळेला नेत गुणवत्तेचा आलेख वाढता ठेवला. शाळेच्या परिसरात लोकसहभागातून घेतलेल्या खेळण्या आजही लहान मुलांचे लक्ष वेधून घेतात. शाळेतील बोलक्या भिंतीनेच कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना बोलत ठेवले.

हेही वाचा: दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश


शाळेत अभ्यासाबरोबरच राबवले जात असलेले पुरक शैक्षणिक उपक्रम ही शाळेची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात त्रिभुवन यशस्वी झाल्या. यात माती काम, कागद काम, चित्रकला, कोलाज काम, राख्या बनवने, किल्ले बनवने, वनभोजन, क्षेत्रभेट, शैक्षणिक सहलीचे आयोजन करणे, वेगवेगळे आनंददायी खेळ घेणे असे उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या मनात त्रिभुवन यांनी शाळेविषयी आस्था निर्माण केली.

शाळा संगणकिकृत केली आहे. त्यांना मोलाची साथ मिळते ती त्यांच्या सहकारी शिक्षिका स्वाती गायकवड यांची. लोकांचे सहकार्य घेत व अडचणीत प्रशासनाचे मार्गदर्शन घेत मार्गक्रमण करणाऱ्या बाबुर्डी गेट येथील महिलांची ही द्विशिक्षकी शाळा म्हणजे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

हेही वाचा: दोघांना वाचवले, पण पोटच्या मुलाला वाचवताना पित्याचाही अंत


शाळेतील विविध उपक्रम

मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी माती काम, कागद काम, चित्रकला, कोलाज काम, राख्या बनवने, किल्ले बनवने, वनभोजन, क्षेत्रभेट, शैक्षणिक सहली, वेगवेगळे आनंददायी खेळ घेणे असे उपक्रम शिक्षिका मंजुश्री त्रिभुवन व स्वाती गायकवड राबवितात.

loading image
go to top