esakal | विद्यार्थ्याचे बँकेत खाते उघडण्यासाठी पालक, शिक्षकांची धावपळ
sakal

बोलून बातमी शोधा

bank

विद्यार्थ्याचे बँकेत खाते उघडण्यासाठी पालक, शिक्षकांची धावपळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षातील मे व जून या दोन महिन्यांतील शालेय पोषण आहाराचे वाटप न करता, त्या आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्याचे बँक खाते उघडण्याच्या, ते आधार लिंक करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने शाळांना दिले आहेत. त्यामुळे पालक शिक्षकांची धावपळ सुरू आहे. (Teachers and parents are rushing to open bank accounts of students for Shaley Poshan Aahar)

जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन देण्यात येते. मात्र गेल्या दीड वर्षापासून कोविड महामारीच्या काळात शाळा व विद्यालये बंद आहेत. पोषण आहाराचे वाटप शाळांमार्फत करण्यात येते. नवीन आदेशानुसार मे व जून या उन्हाळी सुटीच्या काळातील आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तालुक्यात या योजनेअंतर्गत ३४२ जिल्हा परिषद शाळा, सहा नगरपालिका शाळा व ११२ खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील सुमारे ५० हजार ५२६ लाभार्थी आहेत.

कोविड काळात आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आलेल्या ग्रामीण भागातील पालकांसाठी बँकेत रक्कम भरून खाते उघडणे अवघड झाले आहे. त्यामुळे पोषण आहाराची रक्कम पालकांच्या खात्यात जमा केल्यास आर्थिक नुकसान, वेळ वाचून मनस्ताप टळणार आहे. शिवाय कोविडच्या पार्श्‍वभूमीवर बँकांत होणारी गर्दी टाळता येणार आहे.

हेही वाचा: शैक्षणिक संस्थांचा प्रवेशासाठी 'हायटेक' प्रचार!

लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा तांदूळ, हरभरा व तूरडाळ आदी कोरडा शिधा वाटप शाळेमार्फत सुरू आहे. पालकांनी तो घेऊन जावा.

- महावीर धोदाड, अधीक्षक, शालेय पोषण आहार

(Teachers and parents are rushing to open bank accounts of students for Shaley Poshan Aahar)

हेही वाचा: 'बीड-परळी-नगर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी'

loading image